अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत संभाजीराजे छत्रपती : लोकसभा निवडणुकासाठी सारी जुळवाजुळव

शरद पवारांसोबत जाणार असल्याचा दावाही संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत संभाजीराजे छत्रपती : लोकसभा निवडणुकासाठी सारी जुळवाजुळव

मुंबई: अनेक लोक म्हणतात, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार. पण मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे माजी खासदार स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. हे सगळे गणित केवळ लोकसभा निवडणुकांसाठी आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप सरकारसोबत आलेले नऊ मंत्री देखील परत शरद पवार यांच्याकडेच जाणार, असा दावाही त्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविणार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळयात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा काही दिवसांपुर्वी सुरू होती. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी खळबळजनक दावा केला आहे. मी चॅलेंज देउन सांगतो की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहणार. अजितदादांना मुख्यमंत्री करण्यात येणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे. तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार तरी कसे, असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे नऊ मंत्री परत जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नऊ मंत्री भाजपसोबत आले आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत. ते परत एकदा मोठया साहेबांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत जाणार असल्याचा दावाही संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in