
मुंबई : राजधानी दिल्लीत सरहद, पुणे आयोजित व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनापूर्वी विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडीओ शेअर करून देश-विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
कसे सहभागी व्हाल?
आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल, तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडीओ तयार करून पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही, तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन) आपण करू शकता. आपले व्हिडीओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टलवर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. dgiprdlo@gmail.com या ईमेलवर किंवा ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ पाठवता येतील.