संडे स्ट्रिट मोहीमेमध्ये अक्षयकुमार झाला सामिल

अक्षयकुमारने सायकल चालवून मुंबईकरांची मने जिंकली.
संडे स्ट्रिट मोहीमेमध्ये अक्षयकुमार झाला सामिल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी सुरु केलेल्या संडे स्ट्रिट मोहीमेमध्ये रविवारी सकाळी सिनेअभिनेता अक्षयकुमार हा सामिल झाला होता. यावेळी अक्षयकुमारने सायकल चालवून मुंबईकरांची मने जिंकली.

दर रविवारी सकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मोकळ्या रस्त्यावर मुंबईकर योगा, व्यायाम करणे, झुंबा डान्स आणि विविध खेळांचे आनंद घेत होते. त्याला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. रविवारी १९ जूनला सिनेअभिनेता अक्षयकुमारने या संडे स्ट्रिटला भेट दिली. यावेळी अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. कोरोना काळात सर्वत्र शांतता होतील. मात्र नंतरचे चित्र दिलासादायक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरु केलेली संडे स्ट्रिट ही संकल्पना केवळ रविवारीच नव्हे तर कायम राहावी. नागरिकांनी रोज व्यायाम करावा. तसेच सर्व लोकांसोबत चांगले संबंध ठेवावे असे अक्षयकुमारने बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंतसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in