मध्य रेल्वेवरील कल्याण येथे आज सकाळी मोठा रेल्वे अपघात टळला

मध्य रेल्वेवरील कल्याण येथे आज सकाळी मोठा रेल्वे अपघात टळला

ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली व सकाळी 7.15 च्या सुमारास रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली

मध्य रेल्वेवरील कल्याण येथे आज सकाळी मोठा रेल्वे अपघात टळला. कर्तव्यदक्ष ट्रॅकमन मुळे अपघात टळला. कल्याण जलद डाऊन मार्गावर रेल्वेला तडा गेल्याने या मार्गावरील मुंबई लोकल गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. रेल्वे रुळाला तडा गेल्याने सकाळी मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रवासी सुखरूप होते. इंद्रायणी एक्स्प्रेस भरधाव वेगाने येत असताना रेल्वेला तडा गेल्याची घटना उघडकीस आली. त्याचवेळी ड्युटीवरील ट्रॅकमन हिरा लाल आणि मिथुन कुमार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेतले. त्याचवेळी 23 वर्षीय मिथुन कुमारने लगेचच लाल सिग्नल दाखवून एक्स्प्रेस थांबवण्याचा प्रयत्न केला. तर, हिरा लाल (वय 26) हा तडा गेलेल्या ट्रॅकजवळ उभा होता. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला. या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली व सकाळी 7.15 च्या सुमारास रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, मुंबई लोकलवरही रेल्वे रुळावर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाऊण तासात 7.15 च्या सुमारास रेल्वे रुळ तातडीने दुरुस्त करून या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. ऐन गर्दीच्या वेळेस हा बिघाड झाल्याने प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी कामावर जाण्याची घाई असताना लोकल ट्रेनच्या या खोळंब्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in