मुंबईतील सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच आढावा घेण्यात येणार

मुंबईतील सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच आढावा घेण्यात येणार

मुलुंडमधील एका शाळेत नुकत्याच झालेल्या पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच आढावा घेण्यात येणार आहे, असे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले.

मुलुंड (पूर्व) येथे राहणारी पीडित मुलगी एका खाजगी शाळेच्या मैदानात खेळत असताना शाळेतील शिपायाने मिठाई देण्याचे आमिष दाखवून तिला शाळेतील एका खोलीत नेले आणि सोमवारी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मंगळवारी आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या अत्याचाराप्रकरणी सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पांडे यांनी बुधवारी संध्याकाळी त्यांच्या यूट्यूब लाईव्ह सत्रादरम्यान फ्री प्रेस जर्नलने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले कि, “नवघर प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि शाळांच्या सुरक्षेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मी सर्व अतिरिक्त आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळेत मुले सुरक्षित नाहीत असे आम्हाला कुठेही आढळले तर आम्ही कारवाई करू तसेच त्या शाळांमध्ये सुरक्षा वाढविण्याचा प्रयत्न करू", असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in