सातही आरोपींना एनआयए न्यायालयाने सुनावली कोठडी

माध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली.
सातही आरोपींना एनआयए न्यायालयाने सुनावली कोठडी

अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने १५ जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

सोशल मीडियावर वादग्रस्त केलेल्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्रीच्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुर्‍या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या सात जणांना अटक केली.

या सातही आरोपींना गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. ही एक दुर्दैवी घटना आहे. मात्र, त्याला वेगळा रंग दिला जात आहे, असे आरोपींच्या वतीने बाजू मांडण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in