लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप; मुंबई पालिकेचे हायकोर्टात उत्तर

मुंबई महानगरपालिकेकडून हायकोर्टाला सांगण्यात आले “ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून, ती अद्याप प्रलंबित आहे
लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप; मुंबई पालिकेचे हायकोर्टात उत्तर

अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा लिपिकपदाचा राजीनामा मुंबई महापालिकेने का स्वीकारला नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यावर लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असे मुंबई महानगरपालिकेकडून हायकोर्टाला सांगण्यात आले “ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून, ती अद्याप प्रलंबित आहे. एका तक्रारदाराने लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी आम्ही करत आहोत. शिवाय लायसन्सिंगच्या एका प्रकारात त्यांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे,” असेही पालिकेकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे लटके यांच्याविरोधातील दाखल झालेली तक्रार काही तासांपूर्वी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in