महावितरण-टोरंट पॉवरमध्ये कथित ;६ हजार कोटींचा घोटाळा

टोरंटने ऑडिट रिपोर्ट न दिल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी निवेदनातून उपस्थित करून याप्रकरणी कलम ४२० न्वये गुन्हा दाखल केला.
महावितरण-टोरंट पॉवरमध्ये कथित ;६ हजार कोटींचा घोटाळा

भिवंडी: भिवंडीत तालुक्यात २००७ पासून रुजू झालेल्या महावितरणची फ्रँचाईसी कंपनी टोरेंट पॉवरने २०२३ पर्यंत मिळून एकूण ६ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप टोरंट विरोधी महाविकास संघर्ष समितीचे नागेश निमकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

दरम्यान टोरंटने २००७ ते २०२३ पर्यंत २५ हजार कोटींची वसूली केली. तसेच २ दशकापासून २५ ते ३० वेळा विधानमंडळात फ्रँचायजी टोरंट पॉवर व महावितरणाबाबत गैरव्यवहारिक चर्चेसह गैरकारभार व मनमानीची माहिती शासनाला असूनही आजतागायत शासनाने टोरंट विरोधी कोणतीही कारवाई केलेली नाही.

टोरेंटचे हेडऑफिस अहमदाबादला आहे. टोरंटने  संपूर्ण गैरकारभाराचे प्रकरण दाबून ठेवल्याचा आरोपही निमकर यांनी केला आहे. २००७ ते २०२३ पर्यंत शॉर्ट सर्किटने नागरिक मृत होऊन ५०० ते ६०० च्या वरपर्यंत टोरंटविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाल्याचे निमकर यांनी सांगितले. तर महावितरणने टोरंटला किती वीज पुरवली आणि टोरंट महावितरणला किती पैसे दिले याचा हिशोबही लेखापालांकडे नाही. टोरंटने ग्राहकांवर स्वतःचे कर लादून ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट निमकर यांनी केला आहे.

टोरंटने ऑडिट रिपोर्ट न दिल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी निवेदनातून उपस्थित करून याप्रकरणी कलम ४२० न्वये गुन्हा दाखल केला. या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशीची मागणीही निमकर यांनी केली आहे.त्याचप्रमाणे भिवंडीत स्वस्त वीज देणाऱ्या कंपन्यांना तात्काळ परवाने उपलब्ध करून द्यावे, यासह टोरेंट आणि महावितरणने आपसात संगनमताने केलेल्या ६ हजार कोटींच्या घोटाळ्याची कसून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी विनंती निमकर यांनी शेवटी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in