१०वीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी २० हजार टॅबचे वाटप करणार

पालिका शाळांचा दर्जा वाढीसह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.
१०वीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी २० हजार टॅबचे वाटप करणार

१०वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढी बरोबर दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी २० हजार टॅबचे वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपता संपता मुलांच्या हातात टॅब मिळायचे, यंदा हे टॅब वेळेत मिळाल्याने मुलांसह पालकांनाही दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांत ८ भाषेतील शिक्षण दिले जाते. पालिका शाळांचा दर्जा वाढीसह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. बेस्ट बसचा मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता पालिका शाळांतील मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी आठवी ते दहावीच्या मुलांना टॅब देण्याची योजना पालिकेने सहा वर्षापूर्वी आखली. पालिका शाळेत जाणारी मुले ही बहुतांशी झोपडपट्ट्यातील आहेत. या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र ही योजना सुरु झाल्यापासून या योजनेचा बोजवारा उडाला आहे.

मुलांना टॅब वेळेत मिळालेले नाहीत, किंवा त्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊन ही योजनाच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र यंदा १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in