चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची परवानगी द्या

एक दिवस कमी करून तीनच दिवस ध्वनीक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे
चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाची परवानगी द्या

मुंबई : गणेशोत्सव काळात चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी दिली जात असे. यात आणखी एक दिवसाची वाढ म्हणजे पाच दिवसांची परवानगी मिळावी अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली होती. मात्र प्रशासनाने यापूर्वी मिळणाऱ्या चार दिवसांतील एक दिवस कमी करून यंदा तीन दिवसांचीच परवानगी दिली आहे. या निर्णयावर मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी प्रमाणे उत्सवासाठी ध्वनीक्षेपकाची चार दिवसांची परवानगी मिळावी अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी गौरी विसर्जन हे पाचव्या दिवशी येत असल्याने गणेशोत्सवाला तीनच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. समिती सन २०१४ पासून ४ दिवसांऐवजी अधिक दिवसांची मागणी करत आहे. परंतु या वाढीव दिवसाच्या मागणीचा विचार करण्यात आलेला नाही. इतके वर्ष ४ दिवस गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत ध्वनीषेपक वापरण्यास परवानगी दिली जात होती. यंदाच्या वर्षी समितीने अधिक दिवसाची म्हणजे एकूण ५ दिवसाची ध्वनीक्षेपकाची मागणी केली; मात्र बैठकीत प्रशासनाने ४ दिवस देण्याचे सुतोवाच केले; मात्र एक दिवस कमी करून तीनच दिवस ध्वनीक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in