मंत्रालयीन लिपिक, टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयीन लिपिक, टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता

प्रतिनिधी /मुंबई : मंत्रालयात लिपिक, टंकलेखनाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारप्रमाणे लिपिक, टंकलेखकांना ग्रेड पे लागू करण्याची मंत्रालय कर्मचाऱ्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करण्याऐवजी सरकारने त्यांना दरमहा पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ११ कोटी ३४ लाख ६० हजार एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांची संख्या १ हजार ८९१ इतकी असून त्यांना याचा लाभ मिळेल. मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक-टंकलेखक पदावर रूजू झालेले कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकीरीचा प्रवास, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध न होणे या कारणांमुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in