रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी गोविंद पथकाचा सराव

या दहीहंडी सरावाला जे कर्मचारी सेवानिवृत होऊन बाहेर राहायला गेले, असे सर्व कर्मचारी व त्यांची मुले आहेत
रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी गोविंद पथकाचा सराव
Published on

दहीहंडी उत्सव काही दिवसांवर आल्याने दहीहंडी फोडण्याचा सराव गोविंदा पथक करत असताना जे. जे. रुग्णालयातील कर्मचारीही रुग्णसेवा पूर्ण झाल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा सराव करत असून निवृत्त कर्मचारीही जे. जे. रुग्णालयातील गोविंदा पथकात सहभागी झाल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

जे. जे. हॉस्पिटलमधील नवयुग गोविंदा पथक हा कर्मचारी वर्गाचा गोविंदा पथक असून, येथील कर्मचारी हे आपली रुग्णसेवा करून जो वेळ मिळतो, त्या वेळेत दहीहंडीचा सराव करत असतात. या दहीहंडी सरावाला जे कर्मचारी सेवानिवृत होऊन बाहेर राहायला गेले, असे सर्व कर्मचारी व त्यांची मुले आहेत. जे. जे. हॉस्पिटलमधील कर्मचारी वसाहत येथे येतात. नवयुग गोविंदा पथक मागील २० ते २५ वर्षे जे. जे. हॉस्पिटलमधून ठाणे व उपनगर येथे दहीहंडी फोडण्यासाठी जात असतो. जे. जे. हॉस्पिटलचे नाव उंचावर कसे जाईल, यासाठी सर्व कर्मचारी व त्यांची मुले सरावामध्ये मेहनत करत असतात. यावर्षी सात ते आठ थर लावण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी नवयुग गोविंदा पथकाचे मास्तर सुरेश तांबे, प्रमोद पाताडे व अनिल शेलार हे रोज रात्री ९ ते ११ या वेळेत सराव घेत असतात. या नवयुग गोविंदा पथकाला जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ. संजय सुरासे व सर्व अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य असल्याची माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष व मास्तर सुरेश तांबे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in