परदेशी हँडलरच्याही संपर्कात : एनआयएचा आरोप

एनआयएच्या तपासानुसार, नाचनने स्वत:ला धर्मगुरू म्हणून सादर केले. त्याचा मुलगा शामील नाचन यालाही एनआयएने अटक केली आहे.
परदेशी हँडलरच्याही संपर्कात : एनआयएचा आरोप

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी महाराष्ट्र व कर्नाटकात छापेमारी करून १५ जणांना अटक केली. यातील साकीब नाचन हा ‘इसिस’चा महाराष्ट्रातील दहशतवादी मॉड्युलचा मुख्य सूत्रधार होता. तो ‘इसिस’चा परदेशातील हँडलर मोहम्मद भाई, अबू सुलतान आणि अबू सुलेमान यांच्या संपर्कात होता.

एनआयएच्या तपासानुसार, नाचनने स्वत:ला धर्मगुरू म्हणून सादर केले. त्याचा मुलगा शामील नाचन यालाही एनआयएने अटक केली आहे. भारतात ‘इसिस’ खिलाफत संबंधित क्षेत्र बनवण्याचे लक्ष्य नाचनचे होते. आपल्या संघटनेत भरती करताना नाचनने तीन प्रकारच्या शपथ प्रक्रिया तयार केल्या. ज्येष्ठतेनुसार तो भरती करत होता. ही शपथ घेताना त्यांच्या मागे ‘इसिस’चा झेंडा दाखवला जात होता, असे काही अटक आरोपींनी चौकशीत सांगितले.

इस्लामच्या संरक्षणासाठी हिंसाग्रस्त जिहादचा रस्ता त्याने पकडला होता. शरीया कायदा लागू करण्याची त्याची विचारसरणी होती. त्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोबाईल कॅमेऱ्यात नोंदवण्यात आली. नाचन हा त्याचे व्हिडीओ परदेशी हँडलर अबू सुलतान व अबू सुलेमान यांना पाठवले.

एनआयएने अटक आरोपींकडून अनेक इसिसचे ध्वज, बंदुका, चाकू, तलवारी जप्त केल्या. त्याच्या संघटनेत नव्याने भरती झालेल्या अनेकांना अटक झाली. नाचन हा रोज मजलीसवरील विविध मुद्द्यांवर चर्चा करत होता. त्यात तो पॅलेस्टाईनच्या मुद्यावर तसेच भारतातील मुस्लीम या विषयावर चर्चा करत होता. या बैठकांमध्ये तो सहभागी झालेल्या व्यक्तींना हात उंचवायला सांगून जिहादची शपथ देत असे.

साकीब नाचनने अशा संशयितांची व्यवस्था केली जे समाजातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आहेत आणि त्यांची ओळख उघड करू इच्छित नाहीत. या व्यक्ती आर्थिक मदत करत होत्या.

एनआयएतील खात्रीशीर सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील दहशतवादी मॉड्युलमध्ये नऊ जणांचा समावेश होता. त्यात साकीब नाचनचा मुलगा शामील नाचन याचा समावेश होता, तर दोघे जण ‘इसिस’च्या रतलाम येथील मोड्युलचे होते. या मॉड्युलला ‘अल-सुफा’ असे संबोधले जात होते. यातील इम्रान खान व मोहम्मद युनूस साकी यांनी ऑनलाईन शपथ घेतली. नाचन हा ‘इसिस’चे परदेशी हँडलर्स मोहम्मद भाई, अबू सुल्तान, अबू सुलेमान यांना व्हीपीएन, टेलिग्राम, स्नॅपचॅट आणि त्रयस्थ ॲॅपच्या सहाय्याने संपर्कात होता.

एनआयएने मार्च २०२२ मध्ये रतलाम येथील दहशतवादी मोड्युलवर छापेमारी केली. त्यातील फरारी आरोपींनी आश्रयासाठी नाचनशी संपर्क साधला. पडघा येथे नाचन याने त्यांना आसरा दिला होता. रतलामच्या दहशतवादी मॉड्युलमधील काही स्फोटके लपवण्यात आली. या प्रकरणातील सर्व मोबाईल फोन, लॅपटॉप, राऊटर, व्हीपीएन, हार्ड डिस्क हे न्यायवैज्ञक शाखेकडे पाठवले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in