मुंबई मेट्रोतील प्रवाशांना सोयीसुविधा देण्यास सदैव कटिबद्ध; मुंबई मेट्रो अध्यक्ष अश्विनी भिडे यांचे आश्वासन

पर्यावरणाचा विचार करत असताना वृक्षतोडप्रकरणी जनतेचा सहभाग १०० टक्के असला पाहिजे, असे भिडे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई मेट्रोतील प्रवाशांना सोयीसुविधा देण्यास सदैव कटिबद्ध; मुंबई मेट्रो अध्यक्ष अश्विनी भिडे यांचे आश्वासन

प्रतिनिधी/मुंबई अनेक तांत्रिक संकटांचा सामना करत विविध प्राधिकरणाच्या परवानग्या घेत न झोपणाऱ्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत न करता मुंबई मेट्रो प्रोजेक्ट सुरू आहे. मुंबई मेट्रो एक इतिहास रचत असून जगभरातील सर्व सोयीसुविधा मुंबई मेट्रोतील प्रवाशांना देण्यास सदैव कटिबद्ध राहू, असे मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाच्या अध्यक्ष अश्विनी भिडे यांनी आश्वासन दिले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने गुरुवारी आयोजित केलेल्या आप्पा पेंडसे स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे म्हणाल्या की, “मुंबई व उपनगर मेट्रोचे जाळे निर्माण करत असताना अनेक प्रकारचे बोगदे खोदकाम खणण्यात आले. जगभरातील तंत्रज्ञानाचा वापर करत मुंबईकरांचे जनजीवन विस्कळित न होता, रस्त्यावरील वाहतूक खंडित न करता, पायाभूत सोयीसुविधा, जमीन हस्तांतरण, ट्रॅफिक नियम, पर्यावरण काळजी, कामगारांची काळजी, सुरक्षितता, गुणवत्ता, भुयारी कार्य करताना शेजारील जुन्या इमारतीची सुरक्षा, खोदकाम करताना तात्पुरते शिफ्टिंग, नागरी पाणीपुरवठा नळपाईपची काळजी, २४ तास धावणाऱ्या मुंबई शहरात वाहतूक सुरू ठेवत सुरू असलेले भुयारी काम, सरकारी जागा संपादन करणे, झोपडीधारक स्थलांतर, पक्के सदनिकाधारक यांचे स्थलांतर, या व इतर अनेक गोष्टी कराव्या लागल्या. तसेच तांत्रिक, कायदेशीर, पर्यावरण, हेरिटेज, विमानतळ प्राधिकरण विभागाच्या परवानग्या घेत मुंबई मेट्रोचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. जमिनीखाली कसे काम सुरू आहे, याची माहिती मीडियाने जनतेला देत मोठे सहकार्य केले,” असे भिडे यांनी यावेळी सांगितले.

भिडे यांच्या कार्याची माहिती देताना मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे म्हणाले, “भिडे या सांगलीच्या आहेत. त्यांना संगीत फार आवडते. आता त्या डॉक्टरेट पदवी घेत आहेत. अशा या भिडे सध्या मुंबई मेट्रोच्या सेवेत राहून जगभरातील मेट्रोपेक्षा मुंबईतील मेट्रो कशी चांगली सोयीसुविधा देऊन प्रवाशांना दिलासा देईल, यासाठी दिवसरात्र काम करत आहेत.”

मेट्रोच्या मुहूर्ताबद्दल अद्याप खात्री नाही

हा प्रकल्प २३ हजार कोटींचा असून प्रकल्पाच्या ५७ टक्के कर्ज आहे. तिकीट महसूल, जीएसटी इतर कर, इक्विटी, मिळालेल्या जमिनीतून पैसे उभे करू, अशी आर्थिक माहिती देत असताना प्रकल्पाचे वेगवेगळे टप्पे कधी सुरू होतील हे ठामपणे आत्ता या वेळेस सांगता येणार नाही. तसेच पर्यावरणाचा विचार करत असताना वृक्षतोडप्रकरणी जनतेचा सहभाग १०० टक्के असला पाहिजे, असे भिडे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in