Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर माहितीपट; ‘द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे आज प्रसारण

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाज माध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे.
Ambedkar Jayanti : डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर माहितीपट; ‘द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे आज प्रसारण
Published on

मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाज माध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे.

या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सकाळी ११ वाजता ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे.

बाबासाहेबांच्या आयुष्यावर दस्तावेज

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी. जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

महासंचालनालयाच्या समाज माध्यम

लिंकवर कार्यक्रम पाहण्याची सुविधा

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

logo
marathi.freepressjournal.in