मुंबई
अंबरनाथचा पारा 42 अंशांवर
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. मागील दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातही उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहरांमध्ये तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी अंबरनाथ शहरात ४२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. याचवेळी विदर्भात मात्र ३८ ते ३९ अंशांवर पारा होता. त्यामुळे तापमानात अंबरनाथ शहराने विदर्भालाही मागे टाकल्याचे पाहायला मिळाले.