तीन महिन्यांतच BMC मध्ये राजकीय बदल; गटनेते अमय घोले यांचा सुधार समितीचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक तथा पालिकेतील गटनेते अमय घोले यांनी सुधार समितीचा राजीनामा दिला आहे.
तीन महिन्यांतच BMC मध्ये राजकीय बदल; गटनेते अमय घोले यांचा सुधार समितीचा राजीनामा
तीन महिन्यांतच BMC मध्ये राजकीय बदल; गटनेते अमय घोले यांचा सुधार समितीचा राजीनामा
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक तथा पालिकेतील गटनेते अमय घोले यांनी सुधार समितीचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे आमदार तुकाराम काते यांची सून व नगरसेविका समृद्धी काते यांची सुधार समिती सदस्य पदी वर्णी लागणार आहे. तर शिंदे सेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या जवळच्या अश्विनी माटेकर यांची शिक्षण समिती सदस्य पदी वर्णी लागणार आहे. मुंबई महापालिकेत महिन्यांतच तीन राजकीय बदल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सुधार समितीत सध्या २६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा सदस्य असून शिवसेना शिंदे गटाचे तीन सदस्य असून ऊर्वरित सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना उबाठा, एमआयएम, मनसेचा नगरसेवक आहे. या समितीत घोलेही सदस्य आहेत. तर शिवसेनेच्या अंजली नाईक या शिक्षण समितीच्या सदस्यही आहेत.

समृद्धी काते, अश्विनी माटेकर यांना संधी

शिवसेनचे आमदार दिलीप लांडे आणि आमदार तुकाराम काते यांनी आपल्या नातेवाईक आणि जवळच्यांची वर्णी लागावी, यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे पाठपुरावा केला होता. काते यांची सून समृद्धी काते या नगरसेविका असून त्यांची सुधार किंवा अन्य एखाद्या समितीवर वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न करत होते. तर आमदार दिलीप लांडे यांनी पत्नी व नगरसेविका शैला लांडे किंवा नगरसेविका अश्विनी माटेकर यांची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. अखेर यावर पडदा पडला असून तुकाराम काते यांची सून समृद्धी काते आणि अश्विनी माटेकर या दोघा नगरसेविकांना संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in