गणेशोत्सव म्हटले की, सर्वधर्मीय मोठ्या उत्साहात, आतुरतेने लाडक्या बाप्पाची वाट पाहत असतात. गणपती बाप्पा सर्वांच्या हृदयी इतका ठासून भरला आहे की, यावेळी जातपात विसरून आपसूकच त्याचा जयघोष केला जातो. विविध धर्मीय लोक गणरायाची आपल्या घरी तर काही गणरायाची मूर्ती घडवतातदेखील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमीर शेख.
मुंबईतील धारावीमध्ये देवता कला केंद्र या ठिकाणी अमीर शेख हा मूर्तिकार मागील अनेक वर्षांपासून गणरायाच्या सुबक मूर्ती तयार करत आहे. मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती बनवत आहे. अमीर पेपरमॅशपासून इकोफ्रेंडली मूर्ती तयार करतो. या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक असून पाण्यात विरघळण्यासही सोप्या आहेत. वजनाने हलक्या असल्याने सहजरीत्या पाण्यात विरघळतात. सध्या अमीर सात दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी अंतिम रंगकाम तसेच डायमंड काम करण्यात व्यस्त आहेत.