मुंबईत पदाधिकारी बैठकीत अमित शहा आक्रमक ; उद्धव ठाकरेंवर केला शाब्दिक हल्ला

तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकलात. तुम्ही जनतेचा विश्वासघात केल्याचे शहा म्हणाले
Twitter/@AmitShah
Twitter/@AmitShah

राजकारणात सर्वकाही सहन करा पण धोका कधी सहन करू नका. धोका देणाऱ्यांना आता शिक्षा झालीच पाहिजे. या शब्दात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. मुंबईच्या राजकारणात आता भाजपचेच वर्चस्व असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईत हल्लाबोल केला.

अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी आम्हाला कशाप्रकारे धमक्या दिल्या हे तुम्हाला माहीत असेलच, असे अमित शहा म्हणाले. राजकारणात सर्वकाही सहन करा पण धोका पत्करू नका. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरावे. 2019 मध्ये पहिल्यांदाच भाजप पूर्ण बहुमताने सरकारमध्ये आले. असे प्रथमच घडले, 2014 मध्ये शिवसेनेने केवळ दोन जागांसाठी युती तोडली होती, असा खुलासा शहा यांनी केला. भाजपने कधीही लहान भाऊ किंवा मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असून शिवसेनेनेच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे अमित शहा म्हणाले. महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण संपवायचे आहे, असे सांगून शहा यांनी भाजपच्या राजकारणाची भविष्यातील दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मते मागितली आणि जिंकलात. तुम्ही जनतेचा विश्वासघात केल्याचे शहा म्हणाले.

फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं 'अभी नहीं तो कभी नहीं''

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मूळ शिवसेना मुंबईत आमच्यासोबत आली आहे. ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक समजा आणि 'अभी नहीं तो कभी नहीं' हे ठरवा. आता एकच टार्गेट आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in