मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या भगिनी राजेश्वरीबेन शहा यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अमित शहा यांनी त्यांचे पुढच्या दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करून राजेश्वरीबेन यांना श्रद्धांजली अर्पण केली असून शहा कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.
राजेश्वरीबेन यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमित शहा हे अचानक मुंबईत आले होते. भाजपच्या कोणत्याही नेत्यांना त्यांच्या या दौऱ्याची कल्पना नव्हती. बहिणीच्या प्रकृतीची विचारपूस करून ते दिल्लीस परत गेले होते. राजेश्वरीबेन यांचे सोमवारी निधन झाले. अमित शहा यांनी त्यांचे पुढच्या दोन दिवसांतील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश्वरीबेन यांना एक्सवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.