नागपूरचे अमोल काळे ‘एमसीए’चे नवे अध्यक्ष; पवार-शेलार पॅनेलपुढे संदीप पाटील क्लीन बोल्ड

३४३ पैकी १८० पेक्षा जास्त मते मिळाल्यानंतर निकाल औपचारिकपणे जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली
नागपूरचे अमोल काळे ‘एमसीए’चे नवे अध्यक्ष; पवार-शेलार पॅनेलपुढे संदीप पाटील क्लीन बोल्ड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचाच विजय झाला. या पॅनेलचे प्रतिनिधित्व करणारे नागपूरचे अमोल काळे एमसीएच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. अमोल यांना १८३, तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली. अमोल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात.

३४३ पैकी १८० पेक्षा जास्त मते मिळाल्यानंतर निकाल औपचारिकपणे जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. अमोल काळे हे मागील तीन वर्षांपासून एमसीएमध्ये कार्यरत होते. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी युती केली होती. शेलार यांनी बीसीसीआयचे खजिनदार पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या पॅनेलकडून अमोल यांचे नाव जाहीर करण्यात आले.

दरम्यान, अजिंक्य नाईक यांची सचिवपदी निवड झाली असून एमसीए निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एखाद्याला २८९ मते मिळाली आहेत. तसेच संदीप पाटील यांच्या पराभवामुळे तिसऱ्यांदा माजी कसोटीपटूला एमसीए निवडणुकीत पराभव पत्करवा लागला. यापूर्वी, अजित वाडेकर आणि दिलीप वेंगसरकर यांच्यावरही अशी वेळ ओढवली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in