‘जमका’ संमेलनाचा आज अमृतमहोत्सवी सोहळा, मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती

परंपरा आणि नवतेचा संगम असलेल्या दैनिक ‘नवशक्ति’मधील `जनमनाचा कानोसा` या वाचकांच्या सदरातील पत्रलेखनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र लेखकांचे अमृतमहोत्सवी संमेलन शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी होत आहे.
‘जमका’ संमेलनाचा आज अमृतमहोत्सवी सोहळा, मनपा आयुक्त भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती
Published on

मुंबई : परंपरा आणि नवतेचा संगम असलेल्या दैनिक ‘नवशक्ति’मधील `जनमनाचा कानोसा` या वाचकांच्या सदरातील पत्रलेखनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र लेखकांचे अमृतमहोत्सवी संमेलन शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी होत आहे.

या कार्यक्रमास मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि ज्येष्ठ लेखक विनय हर्डीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दै. ‘नवशक्ति’चे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये, श्रीकांत पालेकर आणि मालक एस. सदानंद यांनी २२ ऑगस्ट १९४९ रोजी ‘जनमनाचा कानोसा’ या वाचकांच्या सदरात पत्रलेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखकांचे संमेलन फोर्टच्या तांबे उपहारगृहात भरविले होते. या घटनेला २२ ऑगस्ट २०२४ ला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. वृत्तपत्र लेखकांच्या चळवळीतून मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेचा जन्म झाला आहे. मराठी वृत्तपत्र लेखक संघ व दै. ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘नवशक्ति’ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्याकाळी फ्री प्रेस भवन, नरिमन पॉईंट येथे हे संमेलन आयोजित केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in