जीएसटी लावल्यामुळे अमूलचे दही, लस्सी, ताक झाले महाग

१८ जुलैपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून त्यांच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे.
 जीएसटी लावल्यामुळे अमूलचे दही, लस्सी, ताक झाले महाग

जीएसटी कौन्सिलने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावल्यानंतर मंगळवारपासून अमूलचे दही, लस्सी, ताक महाग झाले आहे. फ्लेवर्ड दुधाच्या बाटल्यांच्या किमतीही वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अशा स्थितीत लवकरच दुधाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १८ जुलैपासून या उत्पादनांवर जीएसटी लागू झाल्यानंतर आजपासून त्यांच्या किमतीतही वाढ होताना दिसत आहे.

अमूलने आता मुंबईत २०० ग्रॅम दही कप २१ रुपयांना केले आहे, जो पूर्वी २० रुपयांना होता. त्याचप्रमाणे ४०० ग्रॅम दहीचा कप आता ४२ रुपयांना मिळणार आहे, जो पूर्वी ४० रुपयांना मिळत होता. पाऊचमध्ये मिळणारे ४०० ग्रॅम दहीही आता ३२ रुपयांना मिळणार, जे आधी ३० रुपयांना मिळत होते. १ किलोचे पॅकेट आता ६५ रुपयांऐवजी ६९ रुपयांना मिळणार आहे.

मुंबईत ५०० ग्रॅम ताकाचे पॅकेट आता १५ ऐवजी १६ रुपयांना मिळणार आहे, तर १७० मिली लस्सीही आता १ रुपयांनी महाग झाली आहे. मात्र, २०० ग्रॅम लस्सी १५ रुपयांनाच मिळणार आहे. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी सांगितले की, छोट्या पॅकेट्सवर वाढलेल्या किमतीचा तोटा आम्ही स्वतः सहन करू, पण काही उत्पादनांवर जीएसटी वाढल्याने किंमत वाढवावी लागली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in