शारीरिक संबंधाला नकार दिल्याने १८ वर्षीय तरुणीला कवटी फुटेपर्यंत मारहाण ; २६ वर्षीय कास्टिंग डायरेक्टर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत एका १८ वर्षीय तरुणीने सेक्ससाठी नकार दिल्याने तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शारीरिक संबंधाला नकार दिल्याने १८ वर्षीय तरुणीला कवटी फुटेपर्यंत मारहाण ; २६ वर्षीय कास्टिंग डायरेक्टर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

राज्यात अत्याचाराच्या घटना काही केल्या की होताना दिसत नाही. मुंबई हे गुन्हेगारीचं केंद्रबिंदू बनत चाललं आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत एका १८ वर्षीय तरुणीने सेक्ससाठी नकार दिल्याने तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका २६ वर्षीय कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आरोपी दीपकला शारीरिक संबंधांसाठी नकार दिल्याने दीपकने तिच्यावर अमानुष अत्याचार केले. यात मुलीची कौटी अनेक ठिकाणी फॅक्चर झाली आहे. आरोपी दीपक मालकर हा बिहारचा रहिवासी असून ११ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता.

मुंबईतून फरार झाल्यानंतर दीपक गुजरातमधील सुरत येथे लपून बसला होता. मुंबई पोलिसांनी आपल्या सुत्रांच्या आधारे सुरत गाठलं. यानंतर १४ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. प्राप्त माहितीनुसार, दीपकने मुलीला केलेल्या मारहानी दरम्यान तिच्या डोक्यावर अनेक वार झाल्याने ती बेशुद्ध पडली. यानंतर मुलीचा मृत्यू झाला असं समजून त्याने तेथून पळ काढला. काही वेळानंतर मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिने मदतीसाठी याचना केली. यांनंतर आजुबाजूच्या लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पीडित मुलीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

बीएसस्सीच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची आरोपी दीपक मालाकर यांच्याशी मागच्या वर्षी फेसबुक या सोशल मीडिया साईटवर मैत्री झाली होती. दोन महिन्यापूर्वी दीपक हा मुलीच्या आई-वडिलांना तिच्याशी लग्न करण्याच्या उद्देशाने भेटला होता. संबंधित मुलीच्या पालकांनी लग्नासाठी होकार देखील दिला होता. यानंतर तो मुलीच्या १ बीएचके घरात राहू लागला. यादरम्यान, त्याने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र, मात्र मुलीने यासाठी नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या दीपकने मुलीला ११ ऑगस्ट रोजी वर्सोवा येथील त्यांच्या मित्राच्या फ्लॅटवर नेलं आणि त्याठिकाणी तिच्याशी लगट करण्याच प्रयत्न केला. मात्र, तरुणीने पुन्हा नकर दिल्याने त्याने तरुणीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

यावेळी मुलगी बेशुद्ध पडल्याने ती मेली असा समज करुन त्याने प्लॅटला बाहेरून कुलुप लावून तेथून पळ काढला. मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजाऱ्यांच्या मदतीने तरुणीने सुटका करुन घेतली. ,सरतला पळून गेल्यानंतर दीपकने आपला मोबाईल बंद केला. मात्र, अन्य लोकल क्रमांकावरुन तो मित्राच्या संपर्कात होता. दरम्यान, त्याने सुरत येथील एका एटीएममधून पैसे काढले होते. यावरुन शोध लावल पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दीपकविरोधात कलम ३०७, ३४२, ३५४ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in