प्रदूषणाला कारण चिंताजनक वाहनवाढ; मोनो, मेट्रोमुळे रस्ता वाहतुकीचे प्रमाण कमी होईल -अश्विनी जोशी

नोव्हेंबरनंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरून प्रदूषणात वाढ झाली. वाढत्या प्रदूषणामागे वाढत्या वाहनांची संख्या ही कारणीभूत आहे.
प्रदूषणाला कारण चिंताजनक वाहनवाढ; मोनो, मेट्रोमुळे रस्ता वाहतुकीचे प्रमाण कमी होईल -अश्विनी जोशी

गिरीश चित्रे/मुंबई : दारात गाडी ही आता प्रत्येकाची गरज झाली आहे. मात्र गाडीच्या पारंपरिक इंधनातून निघणाऱ्या धुरामुळे दिवसेंदिवस प्रदूषणवाढ होत आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये तब्बल ९० लाख वाहनांची नोंद झाली आहे. यापैकी ५० लाख वाहने केवळ मुंबईच्या रस्त्यांवर धावत असल्याने वाहनांची ही संख्या चिंताजनक बनली आहे. दरम्यान, मुंबईत मोनो रेल व मेट्रोचे जाळे विस्तारले जात असल्याने भविष्यात रस्ता वाहतुकीचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी व्यक्त केला.

नोव्हेंबरनंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरून प्रदूषणात वाढ झाली. वाढत्या प्रदूषणामागे वाढत्या वाहनांची संख्या ही कारणीभूत आहे. वाहनांच्या या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्युत वाहनांच्या वापराचा निर्णय माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये घेतला. त्यानंतर महानगरपालिकेतर्फे २०२१-२२ पासून इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली खरी, पण ही विद्युत वाहनांची संख्या अजूनही म्हणावी तितकी वाढलेली नाही. इलेक्ट्रिक वाहनांना पसंती व भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची वाढ लक्षात घेता चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर भर दिला जात आहे. सिनेमागृहे, पेट्रोल पंप आणि महापालिकेच्या वाहनतळाजवळ १० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यात आले असून आणखी १० चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहेत.इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, या पालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे वाहनांद्वारे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यात पालिकेला यश येईल, असा विश्वास पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह परिसरात ९० लाख वाहनांची नोंद

मुंबई, ठाणे व नवी मुंबई या एमएमआर विभागात ९० लाख वाहनांची नोंद झाली आहे, तर मुंबईत ५० लाख वाहने आहेत. दुचाकी २८ लाख, चार चाकी १५ लाख ही मुंबईतील वाहनांची संख्या असून एवढ्या गाड्या रस्त्यावर असतात.

बेस्टच्या ताफ्यात १०० टक्के इलेक्ट्रिक बसेस!

दरम्यान, बेस्ट उपक्रमाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला असून २०२५-२६ या वर्षांत शंभर टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मानवामुळे प्रदूषणात वाढ!

गेल्या काही वर्षांत अति प्रमाणात मानवच प्रदूषणाचे डोंगर उभारत आहे. यामुळे जैवविविधता धोक्यात आली असून नैसर्गिक रचना बदलत आहे. याची परतफेड म्हणून पर्यावरणात असमतोल निर्माण होऊन अवकाळी पाऊस, ऋतुमानात होणारे अचानक बदल, चक्रीवादळे, भूकंपाचे हादरे, तापमानवृद्धी, अति पर्जन्यवृष्टी या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे.

अशी आहे मुंबईतील वाहनांची वर्षनिहाय वाढ

वर्ष - दुचाकी, चारचाकी, बस, ट्रक, रिक्षा, टॅक्सी अशी विविध प्रकारची वाहने समाविष्ट

२०२३ ४९,६७,२११

२०२२ ४२, ८१,२५१

२०२१ ४०,३३, ४९७

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in