राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणार,असे असेल मत्स्यालय...

देशी विदेशी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून या कामासाठी ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राणी बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारणार,असे असेल मत्स्यालय...

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मत्स्यालयात दोन वॉक थ्रू टनेल बांधण्यात येणार असून पर्यटकांना ये-जा करण्यासाठी उपयुक्त असणार आहे. तसेच देशी विदेशी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून या कामासाठी ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे पशू-पक्षी व प्राणी असून नुकतेच आणलेले शिवा अस्वल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यात पेंग्विन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्याचा निर्णय घेतला असून पुढील एक ते दीड वर्षांत मत्स्यालय पर्यटकांसाठी खुले होईल, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.

सुव्हिनियर शॉपची सुविधा!

मत्स्यालयात येणाऱ्या पर्यटकांना खरेदीसाठी सुव्हिनियर शॉपची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. कपडे, किचेन, लहान मुलांसाठी खेळणी खरेदी करता येणार आहे.

असे असणार मत्स्यालय

पारदर्शक काचांचे दोन टनेल

देशी विदेशी मासे पर्यटकांचे आकर्षण ठरणार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in