महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येणार

महालक्ष्मी रेसकोर्स येथे लवकरच अत्याधुनिक दर्जाचे सायकल ट्रॅक व पदपथ विकसित करण्यात येत आहे
महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येणार

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील तब्बल २२५ एकर जमिनीवर जॉगिंग व सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांना रेसकोर्स परिसरातील विहंगम दृश्य २४ × ७ पाहता येणार आहे. रेसकोर्स परिसराचा कायापालट करताना एकही झाड न तोडता पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येणार असल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. दरम्यान, या कामासाठी अंदाजे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागामार्फत महालक्ष्मी रेसकोर्स येथे लवकरच अत्याधुनिक दर्जाचे सायकल ट्रॅक व पदपथ विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ट्रॅक विकसित करताना एकही झाड न तोडता पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येईल. तसेच सामान्य मुंबईकरांना सदर रेसकोर्सचे विहंगम दृश्य २४ तास पाहणे शक्य होईल व पदपथाचा वापरही करता येईल. सदर सायकल ट्रॅक ४.५ किलोमीटर लांबीचा असून पदपथांची रुंदी तीन मीटर असेल. तसेच मनोरंजनाच्या सुविधादेखील उपलब्ध करण्यात येतील. विशेष म्हणजे, सौर ऊर्जेवर आधारित छत उभारण्याचे प्रस्ताविले आहे. पदपथालगत बसण्याची व्यवस्था, तसेच प्रकल्पामध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याशिवाय हरित बस थांबा, सीसीटीव्ही, बैठक व्यवथा, खुले वाचनालय व खुली व्यायामशाळा, नावीन्यपूर्ण सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in