भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना चिंता दिसून आली. त्यामुळे दोलायमान व्यवहारानंतरही मंगळवारी सलग पाचव्या दिवशी मुंबई शेअर बाजारात किंचित वाढ झाली. एफएमसीजी, वीज आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजाराला लाभ झाला.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २०.८६ अंक किंवा ०.०४ टक्का वधारुन ५८,१३६.३६ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८,३२८.४१ या कमाल आणि ५७,७४४.७० किमान पातळीवर होता. एकूण ३० पैकी १६ कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५.४० अंक किंवा ०.०३ टक्का वधारुन १७,३४५.४५वर बंद झाला. सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँक, एशियन पेंट्स‌, एनटीपीसी, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात वाढ झाली. तर टेक महिंद्रा, एचडीएफसी, लार्सन ॲण्ड टुब्रो, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागात घसरण झाली. आशियाई बाजारात सेऊल, शांघाय, टोकियोमध्ये घट झाली. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.७२ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९९.३१ अमेरिकन डॉलर्स झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांनी सोमवारी भांडवली बाजारात २,३२०.६१ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in