जहांगीर आर्ट गॅलरीत निसर्ग आणि मानवतेतील नाते दर्शवणारे चित्रप्रदर्शन

१२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य हे प्रदर्शन पाहता येणार आहे
जहांगीर आर्ट गॅलरीत निसर्ग आणि मानवतेतील नाते दर्शवणारे चित्रप्रदर्शन

निसर्ग आणि मानवता यांच्यातील अतूट नाते सांगणारे एकल चित्रप्रदर्शन आज १२ सप्टेंबर पासून मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई येथील समकालीन चित्रकार निकिता तातेड़ यांनी ही चित्रे रेखाटली असून १२ ते १८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांना विनामूल्य हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी चित्रे मुख्यतः निसर्ग व मानवता आणि त्यातील अतूट नाते दर्शवितात. चित्रकार निकिता तातेड़ यांना बालपणापासून निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याचे कुतूहल होते. त्यामुळे या संकल्पनेवर आधारित अमुर्त शैलीतील चित्रे त्यांनी या प्रदर्शनात रेखाटली आहेत. कॅनव्हासवर रंगाच्या योग्य लेपणातून त्यांनी चित्रे साकारताना अनोखी तंत्रशुद्ध शैली वापरली आहे. आकलनशक्ती आणि दृश्यानुभव ह्या गुणांचा एक कलात्मक समन्वय साधून त्यांनी काढलेल्या बहुरंगी चित्रांमध्ये मुख्यतः संवेदनशील स्त्रिया व त्यांचे भावविश्व फुले,पक्षी, निसर्गदृश्ये व त्यांची वेगवेगळ्या ऋतूत दिसणारी विलोभनीय आणि मनोवेधक रूपे निसर्ग व संवेदनशील मानवी मन ह्यातील अतूट नाते आणि त्यांचे मोहक आशयघन आविष्कार वैगरेचा समावेश आढळतो. स्पेनमधील व्हेन गॉग कलादालन व न्यूयॉर्क आणि नवी दिल्ली येथील सुप्रिध्द कलादालने येथे त्यांनी ह्यापूर्वी आपल्या चित्रांचे सादरीकरण केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in