दादर रेल्वे स्थानक हे मुंबईतील महत्वाचं आणि गर्दी असलेलं मुख्य स्थानक मानलं जातं. दादर रेल्वे स्थानकावर लोकांची सर्वात जास्त वर्दळ असते. या रेल्वे स्थानकावर गाड्या बदलतांना अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांकावरून कायम गोंधळ पाहायला मिळतो. अनेकांचा वेस्टर्न, सेंट्रल आणि हर्बर यात नेहमी गोंधळ होत असतो. ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं सलग फलाट क्रमांक देण्याचा महत्वाचं निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक आहे तेच राहणार आहेत. याउलट, मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला आठ क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे आता मध्य रेल्वेवर आठ ते १४ क्रमांकाचे फलाट आपल्याला बघायला मिळतील. या सगळ्यांची अंबलबजावणी ९ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्हीकडील फलाट क्रमांक १ने सुरू होत असल्यानं प्रवाशांचा उडणारा गोंधळ लक्षात घेऊन हा बद्दल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर स्थानकात सलग १ ते १५ फलाट क्रमांक देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून सुरू झालेला क्रम मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत कायम राहणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच या संदर्भातील बैठक पार पडली आहे. या वेळी फलाट क्रमांक बदलण्यासंदर्भात करारही झाला आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा निर्णय सोईचा होणार आहे.