बसमध्ये वृद्धाला हृदयविकाराचा झटका

घाटकोपर बस डेपोतील बस रुट नंबर ४५३ , बस नंबर ७१७१ ही बस घाटकोपर ठाणे येथील लोकमान्य नगर दरम्यान धावते.
बसमध्ये वृद्धाला हृदयविकाराचा झटका

मुंबई : घाटकोपर बस डेपोतून ठाण्याच्या दिशेने जाणारी बस मुलुंड चेक नाका येथे आली असता प्रवासी रोहिदास रामचंद्र पवार (६२) यांना हदय विकाराचा झटका आला. यावेळी बस मधील कंडक्टर अजुन लाड यांनी पवार यांना सुपीआर दिला. त्यानंतर ठाण्यातील इएसआयएस रुग्णालयात दाखल केले असून, प्रकृती स्थिर असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

घाटकोपर बस डेपोतील बस रुट नंबर ४५३ , बस नंबर ७१७१ ही बस घाटकोपर ठाणे येथील लोकमान्य नगर दरम्यान धावते. रविवारी दुपारी ही बस ठाणे लोकमान्य नगर येथे जाण्यास निघाली. मारुती ग्रुपची भाडेतत्त्वावरील ही बस शनिवारी दुपारी मुलुंड चेक नाका येथे पोहोचली असता बस मधील प्रवासी रोहिदास पवार यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी कंडक्टर अजुन लाड यांनी पवार यांना सुपीआर दिला आणि इएसआयएस रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in