वृद्ध महिलेचे दागिने तोतयागिरी करून पळविले

दोघांनी हातचलाखीने पाकिटातील पाच लाखांचे दागिने घेऊन तेथून पलायन केले
वृद्ध महिलेचे दागिने तोतयागिरी करून पळविले

मुंबई : तोतयागिरी करून एका ८२ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचे सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी पळवून नेल्याची घटना सांताक्रुझ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपीविरुद्ध वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला आहे. ८२ वर्षांची तक्रारदार वृद्ध महिला विजया मधु चारी या विद्याविहार येथील विजयनगर सोसायटीमध्ये राहतात. गुरुवारी १४ सप्टेंबरला त्या सांताक्रुझ येथे कामानिमित्त आल्या होत्या. दुपारी एक वाजता वाकोला ब्रिज येथून अशोकनगरच्या दिशेने जात असताना त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी अडविले. त्यांच्या मालकांना मुलगा झाला असून, ते वृद्धांना दान करत आहेत. तुम्ही आमच्यासोबत चला, तुम्हाला पैसे मिळतील असे सांगितले; मात्र त्यापूर्वी तिने तिच्या अंगावरील दागिने काढून ठेवावे.

मालक गरीब वृद्धांना बक्षिस देत असल्याचे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने तिच्या हातातील बांगड्या, चैन आणि पाटल्या असे पाच लाखांचे दागिने पाकिटात ठेवले होते. याच दरम्यान या दोघांनी हातचलाखीने पाकिटातील पाच लाखांचे दागिने घेऊन तेथून पलायन केले.

logo
marathi.freepressjournal.in