पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचे सिंहावलोकनी प्रदर्शन

कला रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एका देखण्या कालानुभूतीची अपूर्व संधी
पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचे  सिंहावलोकनी प्रदर्शन

पेंटर इलस्ट्रेटर रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं सिंहावलोकनी प्रदर्शन मुंबई मधील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रदर्शनाला विशेष उपस्थिती लावली होती. कलेसाठी सरकारने आवर्जून प्रयत्न करायला हवेत असे सांगत,  कलेची आवड असणाऱ्या जास्त्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

या प्रदर्शनात रवी परांजपे यांच्या अप्रतिम पेंटींग्ज बरोबर, त्यांचा १९५८ ते २०२२ असा प्रदीर्घ कलाप्रवास त्यांच्या व्यावसायिक बोधचित्र स्केचेस, सरावाची चित्र, थंबनेल्स यामधून उलगडणार आहे. कला रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एका देखण्या कालानुभूतीची अपूर्व संधी ठरणार आहे. २० जून ते २६ जून,  या  कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई  सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in