अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा आज पारंपारिक पद्धतीने पार पडला

गोल धना आणि चुनरी विधी या परंपरेनुसार हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा आज पारंपारिक पद्धतीने पार पडला

रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा आज पारंपारिक पद्धतीने पार पडला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी मुंबईतील अँटिलिया बंगल्यात एकमेकांना अंगठी देवाणघेवाण केली. साखरपुड्याच्या निमित्ताने अँटिलिया रोषणाईने उजळले होते.  

अनंत आणि राधिकाचा साखरपुडा पारंपारिक रीतीरिवाजानुसार पार पडला. गोल धना आणि चुनरी विधी या परंपरेनुसार हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासोबत मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामलही दिसले. त्याशिवाय मुलगा आकाश अंबानी आणि सून श्लोका दिसले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in