अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक, शिवसेनेसाठी मोठी लढाई

राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक, शिवसेनेसाठी मोठी लढाई

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे 12 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे सध्या राज्यात अनेक नाट्यमय घटना घडत आहेत. तसेच राज्यातील राजकीय समीकरणही बदलले आहे. याचा परिणाम अंधेरीच्या पोटनिवडणुकीत दिसणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

शिवसेनेत दोन गट असल्याने ही निवडणूक कशी होणार? ठाकरे आणि शिंदे गट कोणते निवडणूक चिन्ह वापरणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार असतील. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर येथे उमेदवार देऊन पोटनिवडणूक लढवण्याची तयारी शिंदे गटाने केली होती. मात्र आता ही जागा भाजपने घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यातच रंगणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in