Gokhale Bridge : दंडाच्या दट्ट्यानंतर गोखले पुलाच्या कामाला वेग, दुसरे गर्डर बसविण्यास सुरुवात

अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डरचे काम करण्यास अक्षम्य विलंब केलेल्या कंत्राटदारावर तीन कोटी रुपये दंडाचा बडगा उगारल्यानंतर आता या कामाला वेग आला आहे.
Gokhale Bridge
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डरचे काम करण्यास अक्षम्य विलंब केलेल्या कंत्राटदारावर तीन कोटी रुपये दंडाचा बडगा उगारल्यानंतर आता या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पासाठीचा दुसरा गर्डर आता आला असून येत्या सात दिवसांत तो बसविण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

गर्डरचे प्रमुख काम मार्गी लागताच तेथील पोहोच रस्त्यांची कामे हाती घेता येतील. त्यासाठी आणखी चार ते सहा महिने कालावधी लागणार आहे. येत्या मार्चअखेरीस किंवा मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर तातडीने तेथील रस्ते खुले करण्याची योजना आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना सोमवारी ही माहिती दिली. या पुलाच्या गर्डरच्या कामात हयगय केल्याबद्दल तेथील कार्यकारी अभियंत्याची बदली करण्यात आली आहे. कामातील विलंबाबाबत कंत्राटदाराला प्रशासनाने नोटीस बजावली होती. कामासाठीचा दुसरा गर्डर १५ जुलैपर्यंत आणला जाणे अपेक्षित होते. तो १५ जुलैपर्यंतही आणला नव्हता. हा विलंब सहन केला जाणार नाही, असे बांगर म्हणाले. रविवारपासून गर्डरच्या टाॅर्किंगचे काम सुरू झाले आहे. पुढील काम करण्यासाठी रेल्वेकडून ब्लाॅक मिळण्याची मागणी पालिका करणार आहे.

गोखले पुलाच्या गर्डरच्या कामातील विलंबाबाबत संबधित कंत्राटदाराला तीन कोटी रुपये दंड आकारला आहे. प्रकल्प खर्चाच्या शून्य पू्र्णांक पाच याप्रमाणे आठवड्याला वाढीव दंडआकारणी होईल. १४ नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मागितल्यास दंड वाढवला जाईल. पालिकेच्या अभियंत्याचीही बदली केली आहे.

अभिजित बांगर, अतिरिक्त पालिका आयुक्त

logo
marathi.freepressjournal.in