अंधेरी, जोगेश्वरीकरांना मिळणार मुबलक पाणी ;४० वर्षे जुन्या जलवाहिन्या बदलणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून त्या जीर्ण झाल्याने, बदलून नव्या टाकण्याचे काम पालिकेच्या जलविभागाने हाती घेतले आहे.
अंधेरी, जोगेश्वरीकरांना मिळणार मुबलक पाणी
;४० वर्षे जुन्या जलवाहिन्या बदलणार

मुंबई : वेरावली जलाशय व्ही-२ पर्यंत जाणाऱ्या जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्या बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या बदलत १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहेच. यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिम व जोगेश्वरीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या जलविभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जलवाहिनी नवीन टाकणे यासाठी मुंबई महापालिका तब्बल १३ कोटी ८८ लाख १९ हजार रुपये खर्चणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून त्या जीर्ण झाल्याने, बदलून नव्या टाकण्याचे काम पालिकेच्या जलविभागाने हाती घेतले आहे. पूर्व उपनगरात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी ९० कोटींच्या निविदा मागवल्या असून पूर्व उपनगरापाठोपाठ पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरातील विविध भागात जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच वेरावली जलाशय व्ही-२ पर्यंत १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी पाणीपुरवठा होतो. या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी ४० फूट खोल अंतरावर असून जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाणी वाया जाते. पाणी गळती रोखण्यासह अंधेरीकरांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वेरावली जलाशय येथे १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in