अंधेरी-कांदिवली चोरीसह घरफोडीच्या दोन घटना; आठ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅशची चोरी

याप्रकरणी अंधेरी आणि कांदिवली पोलिसांनी चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अंधेरी-कांदिवली चोरीसह घरफोडीच्या दोन घटना; आठ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह कॅशची चोरी

मुंबई - अंधेरी आणि कांदिवली परिसरात चोरीसह घरफोडीच्या दोन घटनांनी स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून आठ लाखांचे सोन्याचे विविध दागिने आणि कॅश चोरी करून पलायन केले आहे. याप्रकरणी अंधेरी आणि कांदिवली पोलिसांनी चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू आहे. अंधेरी येथे एका अंगणवाडी सेविकेच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चार लाखांचे दागिने पळवून नेले. ही महिला भाऊबीजसाठी तिच्या बहिणीकडे गेली होती. यावेळी तिच्या घरात प्रवेश करून चोरट्याने हा मुद्देमाल चोरी केला. तिसरी घटना कांदिवलीतील इस्लाम कंपाऊंड, समता सोसायटीमध्ये घडली. तिथे फरीदा अहमद शाह ही महिला राहत असून मनपाच्या पोस्ट विभागात कामाला आहे. १३ नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्याने तिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने तिच्या घरात प्रवेश करून सुमारे चार लाखांचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी फरीदाची मुलगी झीनत रफिक सय्यद हिच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in