अंधेरी, कुर्ला, मालाडकर कचरा, डेब्रिजच्या समस्येने त्रस्त ;अडीच महिन्यांत सहा हजारांहून अधिक तक्रारी

तब्बल ६ हजार ३८८ तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई कचरा मुक्तीचे उद्दीष्ट कागदावरच, असा सवाल केला जात आहे.
अंधेरी, कुर्ला, मालाडकर कचरा, डेब्रिजच्या समस्येने त्रस्त ;अडीच महिन्यांत सहा हजारांहून अधिक तक्रारी

मुंबई : अस्वच्छ रस्ते, कचऱ्याचे ढीग अशा समस्येने मुंबईकर हैराण झाले आहेत. अंधेरी पश्चिम, कुर्ला, भांडुप, माटुंगा, मालाड, गोरेगाव आदी भागांतून कचरा व डेब्रिज समस्यांच्या तक्रारींचा पाऊस पालिकेच्या व्हाट्सअपवर पडला आहे. दरम्यान, ७ जून ते ८ सप्टेंबरपर्यंत तब्बल ६ हजार ३८८ तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई कचरा मुक्तीचे उद्दीष्ट कागदावरच, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई कचरा मुक्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले. तसेच आपल्या प्रभागात रस्त्यावर कुठेही, अस्वच्छता, कचऱ्याची समस्या असल्यास व्हाट्सअप हेल्पलाईन नंबर ही सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देताच पालिका प्रशासनाने कचऱ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी ( ८१६९६८१६९७) हा व्हाट्सअप हेल्पलाईन नंबरची सुविधा केली. ८ जूनपासून व्हाट्सअॅप हेल्पलाईन नंबर मुंबईकरांच्या सेवेत येताच पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार, ९ जून रोजी ३१९ तक्रारी कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कचऱ्याच्या समस्यांच्या तक्रारींचा पाऊसच हेल्पलाईन पडत आहे. ८ जून ते ८ सप्टेंबरपर्यंत तब्बल ६,३८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून, यापैकी सगळ्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझगाव, वांद्रे आदी भागात कचऱ्याचे ढीग निदर्शनास येताच मुंबई महापालिकेला कचरा हटवण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कचऱ्याच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन वर तक्रारींचा पाऊस पडत असून, सर्वाधिक तक्रारी पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरातील असल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

'या' भागांतून सर्वाधिक तक्रारी

अंधेरी पश्चिम - ३८५

कुर्ला - ४९६

मालाड - ३९७

माटुंगा - ३१२

भांडुप - ३०४

गोरेगाव - ३०७

वांद्रे - २५०

अंधेरी पूर्व - २१३

दादर - २१५

खार - १९९

कचऱ्याच्या ४,८४८ तक्रारी

निवारण - ४,८४८

डेब्रिजच्या तक्रारी - १,५४०

निवारण - १५४०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in