
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. राणे रुटीन चेकअपसाठी गेले असताना त्यांना डॉ. जलील पारकर यांनीअँजिओग्राफीचा सल्ला दिला. काही ब्लॉकेजेस आढळून आले, म्हणूनच त्यांच्यावर तत्काळ अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन्ट टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोन-तीन दिवसांत, त्यांची तब्येत पाहून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.