अनिल अंबानींवर १,०८५ कोटींच्या फसवणुकीचा नवा गुन्हा; पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून FIR दाखल

केंद्रीय तपास यंत्रणेने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी संचालक अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनुसार, ही कारवाई पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. बँकेचा आरोप आहे, की अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीने २०१३ ते २०१७ दरम्यान बँकेसोबत १,०८५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
अनिल अंबानी | संग्रहित छायाचित्र
अनिल अंबानी | संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे माजी संचालक अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. एएनआयनुसार, ही कारवाई पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. बँकेचा आरोप आहे, की अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीने २०१३ ते २०१७ दरम्यान बँकेसोबत १,०८५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. सीबीआयने या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि १२०ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत एफआयआर (एफआय) दाखल केला आहे.

‘पीएनबी’, ‘युनायटेड’ बँकेकडून घेतलेल्या निधीचा गैरवापर

‘पीएनबी’चे व्यवस्थापक संतोषकृष्ण अन्नवरपु यांच्या तक्रारीनुसार, अनिल अंबानी आणि कंपनीच्या इतर संचालकांनी बँकेकडून घेतलेल्या निधीचा गैरवापर केला. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपींनी पीएनबीला ६२१.३९ कोटी रुपये आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाला (ज्याचे आता ‘पीएनबी’मध्ये विलीनीकरण झाले आहे) ४६३.८० कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. बँकेचा दावा आहे की, कंपनीने कर्जाची रक्कम अशा ठिकाणी गुंतवली किंवा पाठवली, ज्याची माहिती बँकेला दिलेली नव्हती.

फेब्रुवारीमध्येही फसवणुकीचा गुन्हा झाला दाखल

यापूर्वी फेब्रुवारीमध्येही अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या विरोधात सीबीआयने फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की, अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीने २०१३ ते २०१७ दरम्यान ‘बँक ऑफ बडोदा’सोबत २,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे.

१५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

‘ईडी’ने रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मुंबईतील 'एबोड' हा बंगला जप्त केले आहे. पीटीआय नुसार, त्याची किंमत सुमारे ३,७१६ कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे. बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहे.

logo
marathi.freepressjournal.in