कर चुकवेगिरी प्रकरणी अनिल अंबानी यांना दिलासा

उद्योजक अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. काळा पैसा, २०१५ च्या कर कायद्यांतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशी विरोधात अनिल अंबानी यांनी केलेली याचिका न्या. बर्गीस कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. त्यांच्या विरोधात तूर्तास खटला चालवण्यापासून आणि दंडात्मक कारवाई करण्यापासून अंतरिम दिलासा दिला.
संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : उद्योजक अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. काळा पैसा, २०१५ च्या कर कायद्यांतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशी विरोधात अनिल अंबानी यांनी केलेली याचिका न्या. बर्गीस कुलाबावाला आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. त्यांच्या विरोधात तूर्तास खटला चालवण्यापासून आणि दंडात्मक कारवाई करण्यापासून अंतरिम दिलासा दिला.

अंबानी यांनी २०१५ सालच्या काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर आकारणी कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले असून त्यांची याचिका न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली. तूर्तास यांच्या विरोधात खटला चालवण्याचा अथवा दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश प्राप्तिकर विभागाला देत अंबानी यांना अंतरिम दिलासा दिला. काळा पैसा, २०१५ च्या कर कायद्यांतर्गत जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीला अनिल अंबानी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

झुनझुनवाला यांना सीबीआय कोठडी

अनिल धीरुभाई अंबानी समूहाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुनझुनवाला यांना येथील विशेष न्यायालयाने 'रिलायन्स कमर्शियल फायनान्स'शी संबंधित दुसऱ्या एका कथित बँक फसवणूक प्रकरणात १२ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in