अनिल परबांना ५ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण

ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी खंडपीठाला आश्वासन दिले
अनिल परबांना ५ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण
Published on

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला. न्यायालयाने त्यांना ५ डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतर्गत संरक्षण दिले आहे. ईडीनं दाखल केलेला इसीआयआर रद्द करण्यासाठी परबांनी हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी खंडपीठाला आश्वासन दिले की, जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात सुरू आहे, तोपर्यंत अनिल परब यांना ईडी अटक करणार नाही. त्यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ५ डिसेंबर रोजी ठेवली आहे. अनिल परब यांनी आपल्याविरोधातील ही याचिका रद्दबातल करण्याची मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in