चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकी देत असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ वायरल झाला आणि अजित पवार हे विरोधकांचे स्फॉट टार्गेट झाले. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतेही समोर आले आहेत.
चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव
Published on

मुंबई : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकी देत असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ वायरल झाला आणि अजित पवार हे विरोधकांचे स्फॉट टार्गेट झाले. अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतेही समोर आले आहेत. अमोल मिटकरी यांनी तर आयपीएस अधिकारी यांच्या नियुक्तीवर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी लावून धरली होती. मात्र ४८ तासांत मिटकरी यांनी या मागणीवरून घूमजाव करत ही माझी वैयक्तिक मागणी होती, पक्षाची नव्हती, असे स्पष्टीकरण मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला फोनवरून दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आले आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, महिला अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती. त्याबाबत त्यांनी पत्र देखील लिहले होते. त्यानंतर आता पुन्हा अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ही आपली भूमिका होती, पक्षाची नाही, मी पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहे, असेही मिटकरींनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in