
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कथित १३० कोटींच्या घोटाळाप्रकरणात राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. विशेष सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाविरोधात सीआयडीने उच्च न्याचालयात धाव घेतली आहे. कदम यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाने एका प्रकरणात जामीन दिल्यानंतरही अन्य पाच गुन्ह्यात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना विशेष सत्र न्यायालयाधीश राहुल रोकडे यांनी जामीन मंजूर केला; मात्र एका प्रकरणात सोलापूर न्यायालयात जामीनासाठी केलेल्या अर्जावर अद्याप निर्णय न झाल्याने त्यांची तुरंगातून सुटका झालेली नाही. दरम्यान, मुंबई विशेष सत्र न्यायालयाच्या जामीन देण्याच्या निर्णयाविरोधात सीआयडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.