मुंबईत लवकरच दुसरा केबल-स्टे ब्रीज सुरू होणार

मुंबईमध्ये लवकरच दुसरा केबल-स्टे ब्रीज सुरू होणार आहे. जो शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये एक मोठा टप्पा ठरेल.
मुंबईत लवकरच दुसरा केबल-स्टे ब्रीज सुरू होणार
Published on

कमल मिश्रा / मुंबई

मुंबईमध्ये लवकरच दुसरा केबल-स्टे ब्रीज सुरू होणार आहे. जो शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये एक मोठा टप्पा ठरेल. रे रोड येथे बांधण्यात आलेल्या सहा लेनच्या नवीन पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

ब्रीजचे काम अंतिम टप्प्यात आल्याने एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व पाया बांधकाम, गर्डर लाँचिंग आणि सुपर स्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे. केबल-स्टे रोड ओव्हर ब्रीजचे (ROB) संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. हा पूल लवकरच सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

या पुलाच्या बांधकामाला १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरुवात झाली होती. ROB ची लांबी ३८५ मीटर असून, त्याला दोन डाऊन रॅम्प्स आहेत. पुलाला एकूण ६ लेन असतील. हा प्रकल्प सुमारे रु. २७३ कोटींच्या खर्चाने पूर्ण होत आहे.

प्रारंभी हा पूल नोव्हेंबर २०२३ मध्ये खुला करण्याचे नियोजित होते, मात्र काही अतिक्रमणाच्या अडचणींमुळे प्रकल्पाला किंचित विलंब झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रे रोड केबल-स्टे ROB सेंट्रल पायलॉन सिस्टीम वापरून तयार केला आहे, ज्यामध्ये ब्रीजच्या मध्यभागी असलेल्या स्पाइन गर्डरवर स्टे केबल्स उभ्या केल्या आहेत.

पुलाच्या डिझाइनविषयी माहिती

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा पूल मर्यादित पायऱ्यांसह आणि कमी पाया बांधकामासह डिझाइन केला आहे.

सेगमेंटल बांधकाम पद्धती वापरण्यात आली आहे. यामुळे गुणवत्तेवर अधिक नियंत्रण ठेवता येते आणि बांधकामाचा कालावधी कमी होतो.

प्रत्येक सेगमेंट फॅब्रिकेशन यार्डमध्ये तयार करून प्रत्यक्ष जागेवर नेऊन बसवले जातात.

सरळ मार्गासाठी स्टील गर्डर सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामुळे काम जलद आणि सोपे होते.

वाहतूक व्यवस्थेवर प्रभाव, सौंदर्यदृष्ट्या आकर्षक डिझाइन असून या नवीन पुलामुळे भूमिगत सुविधा प्रभावित होणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.

पुलाच्या खालील भागातून बॅरिस्टर नाथ पै रोडवरील वाहतूक सुरू राहील.

ईस्टर्न फ्रीवेखाली आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रेल्वे मार्गावर आवश्यक उंची ठेवण्यात आली आहे.

पुलाला आकर्षक LED आर्किटेक्चरल लाइटिंग लावण्यात येणार आहे. ते पुलाच्या सौंदर्यवर्धनासोबतच सुरक्षितता वाढवेल.

ब्रीज हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम बसवली जाणार आहे. ती पुलाच्या भक्क्कमतेची चाचपणी करेल.

मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा पूल एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून तो शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in