शिंदे सेनेच्या नेत्यावर अटकेनंतर आणखी एक गुन्हा दाखल

शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर कांदिवलीत एक मराठी कुटुंबाच्या मालकीचे दुकान बळजबरीने काबीज केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे सेनेच्या नेत्यावर अटकेनंतर आणखी एक गुन्हा दाखल
Published on

मुंबई : रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी रविवारी शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर कांदिवलीत एक मराठी कुटुंबाच्या मालकीचे दुकान बळजबरीने काबीज केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अटकेनंतर काही तासांतच राजपुरोहित यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांनी राजपुरोहित आणि त्याचे सहकारी हरिश माकडिया यांच्याविरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार बोरिवलीच्या रहिवासी सुषमा पै यांनी तक्रारीत म्हटले की, २०२१ मध्ये पती दत्तराम पई याच्या उपचाराकरिता निधी उभारण्यासाठी त्यांचे दुकान विकायचे होते. राजपुरोहितसोबत ₹५२ लाखांत करार झाला होता. त्याने काही छोटी रक्कम दिली आणि दुकान घेतले.

पै कुटुंब ठरलेल्या वेळेत पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये राजपुरोहितच्या कार्यालयात पैसे मागण्यासाठी गेले असता राजपुरोहितने त्यांना त्याच्याकडे पैसे नाहीत, पण तो नंतर देईल, असे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in