प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचे आणखी एक पाऊल' लाल सिग्नल क्रॉस, तरी लोकल जागेवरच जाम मुख्य स्थानकांच्या रूळांवर ट्रॅक मॅग्नेट सिस्टिम

कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी समर्पित आहे
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचे आणखी एक पाऊल' लाल सिग्नल क्रॉस, तरी लोकल जागेवरच जाम मुख्य स्थानकांच्या रूळांवर ट्रॅक मॅग्नेट सिस्टिम

मुंबई : दोन लोकलमध्ये संभाव्य टक्कर टाळणे, सिग्नल पासिंग अशा दुर्घटना टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे या मुख्य स्थानकांसह बहुतांश रेल्वे स्थानकातील रूळांवर ट्रॅक मॅग्नेट सिस्टिम कार्यान्वित केली असून काही ठिकाणी हे काम प्रगतीपथावर आहे. ट्रॅक मॅग्नेट सिस्टिममुळे लाल सिग्नल असतानाही लोकल पुढे जात असली तरी या सिस्टिममुळे लोकल जागेवरून हलणार नाही आणि संभाव्य धोका टाळणे शक्य होईल, असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी व्यक्त केला.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने त्यांच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये समांतर अतिरिक्त ट्रॅक मॅग्नेट सहाय्यक चेतावणी प्रणाली यशस्वीरित्या लागू केली आहे. सुरक्षा उपायांना अधिक बळकट करणे आणि मुंबई विभागातील संभाव्य टक्कर किंवा सिग्नल पासिंग अॅट डेंजर घटनांना रोखणे, हा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले. उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये सहायक चेतावणी प्रणाली हे काही काळापासून एक महत्त्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे. ट्रेनने लाल स्थितीत सिग्नल ओलांडल्यास किंवा परवानगी असलेल्या वेग मर्यादा ओलांडल्यास ट्रॅक मॅग्नेट सिस्टिममुळे आपोआप ब्रेक लागला जाईल. सुरक्षा उपाय वाढवण्यासाठी आणि एसपीएडीचा धोका कमी करण्यासाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय विभागांमध्ये समांतर अतिरिक्त ट्रॅक मॅग्नेट सिस्टिम कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे.

असे काम प्रगतीपथावर

एकूण व्यवहार्य श्रेणी : १६४ स्थाने

पीटीएमसह स्थापित स्थाने : ५८ स्थाने

उर्वरित : १०६ ठिकाणी मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समर्पित

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग या महत्त्वपूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी अंमलबजावणीत सहभागी असलेल्या सर्व भागधारकांचे आभार व्यक्त करतो. हा विभाग आपल्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी समर्पित आहे.

logo
marathi.freepressjournal.in