भाजपच्या खोट्या प्रचाराला त्याच पद्धतीने उत्तर द्या : संजय राउत

भाजपच्या खोट्या प्रचाराला त्याच पद्धतीने उत्तर द्या : संजय राउत

भाजपकडून गोबेल्स नीतीने विरोधकांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू असून आपण मात्र नैतिकता सांभाळत बसलो आहे. याला जर युद्ध म्हणून भाजप नैतिकता पाळत नसतील तर आपल्यालाही त्यांचा कोथळा काढण्याचा अधिकार आहे. तेव्हा भाजपच्या खोट्या प्रचाराला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सोशल मीडिया सैनिक मेळाव्यात उपस्थित तरुणांना केले.

शिवसेनेचा सोशल मीडिया सैनिक मेळावा रविवारी राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे पार पडला. युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

“हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास पुढे न्यायचे काम हे आता तरुणपीढीचे आहे. राज्य आपल्याला कायम राखायचे असेल तर विरोधकांची रणनीती आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि त्यांच्या खोट्या प्रचाराला योग्य उत्तर द्यावे लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in