अन्टॉप हिलमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन; कारवाईसाठी पालिकेचे केंद्रीय बांधकाम विभागाला निर्देश

हिवाळ्यात प्रदूषण वाढीचा धोका लक्षात घेता मुंबई मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कडक पावले उचलली.
अन्टॉप हिलमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन; कारवाईसाठी पालिकेचे केंद्रीय बांधकाम विभागाला निर्देश

मुंबई : अन्टॉप हिल परिसरातील सीजीएस कॉलनी सेक्टर ७ मधील बिल्डिंग नंबर ४२ ते ४५ दरम्यान मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र बांधकाम ठिकाणी पालिकेची नियमावली धाब्यावर बसवल्याचे वृत्त दैनिक 'नवशक्ति'ने शनिवारी प्रसिद्ध केले. बातमीची दखल घेत पालिकेच्या एफ उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पहाणीत काम सुरू असून, ही जागा केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालिकेने कारवाईसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिले आहेत.

हिवाळ्यात प्रदूषण वाढीचा धोका लक्षात घेता मुंबई मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कडक पावले उचलली. यात बांधकाम ठिकाणी धुळीचे कण पसरु नये यासाठी पडदे लावणे पाण्याची फवारणी करणे स्प्रिकलर बसवणे, भिंत अथवा पत्रे लावणे अशी २७ प्रकारची नियमावली २५ ऑक्टोबर रोजी मुंबई महापालिकेनेही जारी केली. नियमावली जारी केल्यानंतर बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन न करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अन्टॉप हिल सीजीएस कॉलनी सेक्टर ७ मध्ये बिल्डिंग नंबर ४२ ते ४५ दरम्यान मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे; मात्र पालिकेने जारी केलेल्या नियमावलीला चक्क केराची टोपली दाखवत सर्रास काम सुरू असल्याचे वृत्त दैनिक 'नवशक्ति'ने शनिवारी प्रसिद्ध केले. बातमी प्रसिद्ध होताच पालिकेच्या 'एफ उत्तर' कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीने पहाणी केली. ही जागा केंद्रशासनाच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी मलनि:सारण वाहिनी टाकण्याचे काम केंद्रिय सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या कामावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राडारोडा साफसफाईचे काम सुरू!

दरम्यान, कारवाईसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला पालिकेने निर्देश देताच राडारोडा, साफसफाईचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in